स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ लोकमतच्या वतीने पवनी येथील लक्ष्मीरमा सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, तहसीलदार नीलिमा रंगारी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, तालुका संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे, गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, क्रांती शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. नितीन हुमणे, राजमुद्रा सामाजिक व क्रीडा मंडळाचे ॠषीकुमार सुपारे , सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, नीलेश भिलावे आणि सुमित्रा साखरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रकाश देशकर यांनी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहवासात घालविलेल्या क्षणांची आठवण करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकमत सातत्याने पाठपुरावा करतो याचा आवर्जून उल्लेख केला. संचालन सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले, तर आभार लोकमत पवनी तालुका प्रतिनिधी अशोक पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला लोकमत जिल्हा शाखा व्यवस्थापक मोहन धवड, सखी मंच तालुका संयोजिका अल्का भागवत, मनोहर मेश्राम, विनोद भगत, प्रदीप घाडगे, संध्या रामटेके उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवणे व त्यांचे सहकारी, पवनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत गभने, शहर अध्यक्ष अमित पारधी, एनएसयूआयचे तालुका अध्यक्ष महेश नान्हे, तुषार जावळे, अंकुश दुराई, लक्ष्मीरमा सभागृहाचे प्रमुख आशिष फुलबांधे यांनी सहकार्य केले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
रक्तदान शिबिराची सुरुवात तालुका गट समन्वयक दीपाली बोरीकर-झीलपे यांच्या रक्तदानाने करण्यात आली. तुषार जावळे, अंकुश दुराई, वसंत गजभिये, घनश्याम कोसरावे , ममता गायकवाड, उमेश बावनकर, गौरव माकडे, सौरभ गाडेकर, सुरेश तलमले, महेश नान्हे, पिराजी मुंडे, महादेव मुंडले, प्रियांशू लोखंडे, योगेश निखारे, सुनील हांडे, अमित पारधी, अनिकेत गभने, राहुल गभने आणि प्रतिभा पारधी यांनी रक्तदान केले.