स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार मनोहर कोरेट्टी, दिघोरीचे ठाणेदार नीलेश गावंडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विरसेन चहांदे, संदीप ताराम, अमोल कोकाटे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, माजी नगरसेवक बंटी सहजवाणी, माजी नगरसेवक नीलिमा टेंभुर्णे, कॉंग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे विधानसभा प्रमुख मनोज बंसोड, कॉंग्रेसचे तालुका समन्वयक उत्तम भागडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, खेमराज भुते, गिरीधर नागेश्वर, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, भोजराज कडीखाये, मुख्याध्यापक गोरखनाथ वंजारी, विजय खापर्डे उपस्थित होते. रक्त संकलन जिल्हा रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सचिन करंजेकर, परिचारिका सुरेखा भिवगडे, रक्तपेढी परिचर राजू नागदेवे, राहुल गिरी, मयूर खोब्रागडे यांनी केले. यावेळी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका यामिनी देशमुख, अनामिका कोड्डे, दुर्गा भुते, तेजस्विनी वरंभे यांनी सहकार्य केले.
शिबिरासाठी योगेश देशकर, मिलिंद परशुरामकर,जागेश्वर कांबळे, आकाश तिघरे, रोहित भुरले, मोहित रायपुरे, सौरभ राऊत, सिद्धार्थ युथ क्लबचे अध्यक्ष कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, कुलदीप दोनाडकर, सौरभ बंसोड, साहिल गजभिये, अभिषेक घोरमोडे, दर्शन मेश्राम, नितीन पारधी, ‘लोकमत’चे वितरक प्रमोद टेंभुर्णे, तालुका सखी संयोजिका कल्पना जाधव यांचे सहकार्य मिळाले. रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. संचलन लोकमत तालुका प्रतिनिधी दयाल भोवते यांनी केले तर आभार साकोली लोकमत सखी मंच संयोजिका सुचिता आगाशे यांनी मानले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, शिक्षक प्रेमलाल गावडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, जयपाल राऊत, दर्शन मेश्राम, मिलिंद परशुरामकर, रोहित सोनवने, साहिल गजभिये, मुदतशिर पठाण, अभिषेक घोरमोडे, कुलदीप दोनाडकर, कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, दयाल भोवते आदींनी रक्तदान केले.
बॉक्स :
अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
लाखांदूर येथील रक्तदान शिबिर आगळेवेगळे ठरले. या शिबिरात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी : रक्तदान केले. यात नायब तहसीलदार, वनपरिक्षेत्रधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक यांचा समावेश आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी स्वत: रक्तदान करून युवकांना रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
170721\1543-img-20210717-wa0033.jpg
ऊद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर