लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : रक्तदान हे जीवनदान देत असल्याने ते सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे आता अत्यावश्यक झाले आहे. काेराेना काळात रक्ताची माेठी समस्या निर्माण झाली हाेती. मात्र, दात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे भविष्यात रक्तदान ही चळवळ व्हावी, असे प्रतिपादन साकाेली पंचायत समितीचे माजी सभापती मदन रामटेके यांनी केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाेकमतच्या वतीने साकाेली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात मंगळवारी ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी तहसीलदार रमेश कुंभरे हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी माधुरी मडावी, पाेलीस निरीक्षक जितेंद्र बाेरकर, राष्ट्रवादी साकाेली विधानसभा अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, राष्ट्रवादीचे निखिल जिभकाटे, सरपंच रामहरण पाेहरे, डाॅ. राजेश चंदवाणी, डाॅ. अतुल दाेनाेडे, नगरसेवक मनिष कापगते, ग्रामीण विकास संघटना सदस्य दर्शन कटकवार, प्राचार्य विजय देवगिरीकर, क्रीडा शिक्षक शाहिद कुरैशी, प्रा. प्रशांत शिवणकर, मुख्याध्यापक पुणाजी कटरे, गाेलू धुर्वे उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी रक्तदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तालुका सखी मंच संयाेजिका सुचिता आगाशे यांनी केले. कार्यक्रमाला लाेकमत जिल्हा शाखा व्यवस्थापक माेहन धवड, लाेकमत साकाेली तालुका प्रतिनिधी संजय साठवणे, सखी मंचच्या जिल्हा संयाेजिका सीमा नंदनवार, मनीषा रक्षीये यांची उपस्थिती हाेती. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. मीरा साेनवाणे, सीमा तिजारे, सुरेखा भीवगडे, विशाल गायकवाड, राजू नागदेवे, लाेकेश गाेटेफाेडे, राहूल गिरी, मनिष दयाल, मयूर खाेब्रागडे, प्रिया मेश्राम, आकाश महाजन यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.
यांनी केले रक्तदान- या शिबिरात माेहसिन मुस्तफा शेख, संदीप कापगते, हर्षल हेमणे, डाॅ. राजेश चंदवाणी, राेशन कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, विवेक कापगते, राेहित तरजुले, राकेश धुर्वे, सचिन खुणे, प्यारेलाल आचले, स्वामी नेवारे, रजत काळसर्पे, निखिल जिभकाटे, प्रशांत गुरव, धनपाल सहाळा, अतुल वाढई, दुशांत जाेशी, अमाेल राऊत, सृजल लांजेवार, लाेकेश पारधी आणि प्रचिता बावनकर यांनी रक्तदान केले.