शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

रिचार्ज शॉफ्टद्वारे पुनर्भरणासाठी तलावात खोदल्या बोअरवेल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:11 PM

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : भूजल पातळी वाढीसाठी पालोरा परिसरातील पहिला प्रयोग

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले. सदर कामांचे तांत्रिक मार्गदर्शन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी केले असून यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात तलावात साठलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.मोहाडी तालुक्यातील करडी परिसराला निसर्गाचा शाप आहे. वैनगंगा नदी जवळून वाहत असताना तसेच कोका वन्यजीव अभयारण्य व न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल सभोवताल असताना भूगर्भात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारीतच बोअरवेल्स व विहिरी कोरड्या पडतात. पावसाळ्यात डोंगर टेकड्यांवरून ओसंडून वाहणारे पावसाचे पाणी अडवून साठविण्यासाठी टेकड्यांच्या पायथ्यांशी मोठ्या प्रमाणात लहान तलाव - बोड्या आहेत. मात्र, त्यांची दूरवस्था आहे. तलाव गाळाने बुजलेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांचा श्वास अवरुद्ध आहे. त्यामुळे खरीपातील पिकांनाही येथीलु पाण्याचा पुरेशा फायदा होत नाही. पडलेले पावसाचे पाणी सरळ शेती, नाले, ओढ्यांतून वाहून जाते. मागील चार वर्षांपासून खरीपातील दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाठीला पुजलेला आहे. अल्प पावसामुळे हजारो एकर शेती पडीत राहून त्यासाठी केलेला खर्च वाया जात आहे. त्यावर उपाय म्हणून करडी परिसरात पाणी अडविणारी, जिरविणारी व मुरविणारी पुनर्भरण यंत्रणा कार्यान्वित होण्याची आवश्यकता होती.शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे काही प्रमाणात का होईना चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. विविध विभागांचे माध्यमातून तलाव, नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरु आहेत. ठिकठिकाणी बंधारे बांधले जात असून तुटलेल्या बंधाºयांच्या दुरुस्त्या युद्ध पातळीवर आहेत. वनविभागाद्वारे वृक्षारोपण व पाणी अडविण्यासाठी समतल चरे खोदकाम, शेतबोड्या, शेततळे, सिंचन विहिरी आदिंच्या कामाचा सपाटा आहे. भूजल पातळीत वाढ होण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पालोरा येथे हुडकी तलावात ग्रामपंचायत पालोराचे सहकार्याने रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने केले. यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला. तलावात साठवलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल, असा विश्वास विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.कोरडवाहू पालोरा परिसरातील हा नाविण्यपूर्ण प्रयोग आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांच्या कार्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून सिंचन विहिरी व बोअरवेल्स यांना त्याचा फायदा होणार आहे.-महादेव बुरडे, सरपंच, ग्रामपंचायत, पालोरा.