अखेर बेपत्ता व्यवसायिकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 9:58 PM
वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यवसायीकाचे प्रेत चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड नदीपात्रात आढळले. गत मंगळवारपासून ते बेपत्ता होते. चंद्रशेखर प्रभाकर भागवत (४०) असे मृत व्यवसायीकाचे नाव आहे.
<p>भंडारा : वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यवसायीकाचे प्रेत चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड नदीपात्रात आढळले. गत मंगळवारपासून ते बेपत्ता होते.चंद्रशेखर प्रभाकर भागवत (४०) असे मृत व्यवसायीकाचे नाव आहे. मंगळवारी आपल्या मुलीच्या शालेय प्रवेशासाठी जात असल्याचे सांगून सायकलने घरून निघून गेले. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. दरम्यान वैनगंगा नदीच्या पुलाजवळ त्यांची सायकल आढळली होती. तसेच एका प्रत्यक्षदर्शीनेही त्यांच्या सारख्या तरुणाने नदीपात्रात उडी घेतल्याचे सांगितले होते. त्यावरून पोलिसात सूचना देण्यात आली. पोलीस आणि नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु झाला. अखेर शुक्रवारी त्यांचा मृतदेह गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड येथील नदीपात्रात आढळून आला. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. चंद्रशेखर भागवत यांचे येथील डॉ.आंबेडकर चौकात लेडीज कॉर्नर दुकान आहे.