शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बोगस बियाणे बाजारात येणार!

By admin | Published: June 03, 2015 12:43 AM

जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

पालांदूर : जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपन्यांनीही शेतकऱ्यांची कमजोरी व अज्ञानाचा लाभ उठवत दरवर्षी डझनभर नवीन वाण आणून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. जिल्ह्यात धान बियाणे कृषीकेंद्रात आले असून विक्रीकरीता उपलब्ध लवकरच होणार आहेत. यात बोगस बियाणे असण्याची चिन्हे अधिक आहेत.धानाचा एक वाण तयार करण्याकरीता, शोधण्याकरीता सुमारे दहा ते बारा वर्ष लागतात. मात्र बाजारात दरवर्षी नवनवीन वाण आणून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते. वाण/जात एकच असते. फक्त पॅकींग व कंपनीचे नाव बदलवून अधिक नफा कमविण्याच्या लालसेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जातात. दोन वर्षापूर्वी खराशी व पालांदूर परिसरात अशाच एका नामवंत कंपनीचे आरपीएन जातीचे वाण बोगगस निघाले.साठ टक्क्याच्या वर भेसळ बियाणे असल्याने निसण्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्न नाहीच्या बरोबर आले. तक्रार झाली, चौकशी आटोपली पण अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंपनी मोकळी सुटली. कालपरवा पर्यंत कर्तव्यनिष्ठ समजले जाणारे कृषी विभागाचे अधिकारीही प्रवाहासोबत राहून शेतकऱ्यांवर अन्याय करतात. रब्बीतही याच कंपनीचे बियाणे धोकादायक ठरतात. धान निसवल्यावर असताना काही गर्भात, काही पूर्णपणे फुललेला तर काही पूर्णपणे भरलेला असतो. एकावेळी पूर्ण धान कापणीला येत नाही. यामुळे कालावधी निश्चिततेपेक्षा अधिक राहतो. यामुळे हंगाम धोक्यात येऊन नुकसानीची भिती अधिक असते. (वार्ताहर)शक्यतो घरचे बियाणे वापराशेतकऱ्यांनो, नफा-तोटा लक्षात घेऊन शेती करणे अगत्याचे आहे. ९०-१२५ रुपये प्रति किलो भावाचे धान बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरचेच वाण योग्य काळजीने ठेवले तर दरवर्षी नवीन बियाणे घेणे गरजेचे राहणार नाही. आपली शेती परावलंबी करु नका. बियाणे स्वत: शोधा, तयार करा व स्वत:च पुढे येऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जुने ते सोने म्हणत यातूनच नवीन वाणाची निर्मिती होते तसा प्रयोग स्वत:पासून तयार करा. याकरीता शासनाची कृषी विभागाकडून माहिती पुरविली जाते. जुने घरचेच वाण बियाणे म्हणून वापरताना साधी घरच्याघरी प्रक्रिया करुन बियाणे वापरु शकता.