राष्ट्रीय महामार्ग ठाणा येथील घटना
जवाहरनगर : मजुरीच्या कामासाठी हैदराबादला जाणाऱ्या बेलोरो गाडीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात बोलेरो वाहनचालक महेश चैनलाल सिंगनदुपे (वय २८), रा. मऱ्हारी टोला दमोह,(जि. बालाघाट) हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेली प्रवासी सोनिया पंचवे (२३) जखमी झाली आहे. जखमीला सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मजदुरीच्या कामाकरिता जाण्यासाठी मऱ्हारी टोला येथून चारचाकी (०९-जे.ऐ.९८४८)ने हैदराबादला जाण्यासाठी निघाले. वाहनात मजुरीचे काम करणारे मजूर फिर्यादी लोकेशदास मुरचुले (१९), रा. मऱ्हारी टोला यांचे नातेवाईक राजकुमार मरकाम, तुलरकू मरकाम, रा. डोकी राजनांदगाव, सोनिया पंचवे, रा. परसाही (बालाघाट), रमेश ठाकरे, रा. बालाघाट व चालक महेश सिंगनतदुपे यांचा समावेश होता. दरम्यान, शनिवारी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास शहापूर ठाणा जुना राष्ट्रीय महामार्ग टी पाईंट दरम्यान दोन ट्रकचा अपघात झाल्याने भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खंडित झाली होती. बोलेरो चालक महेश सिंगनदुपे यांनी नागपूरकडे जाण्यासाठी गाडी वळविली. दरम्यान, समोर असलेल्या दुसऱ्या ट्रकला ओलांडून वेगाने समोर गेल्याने समोरून भंडाराकडे येणाऱ्या ट्रक (एम. एच. ०४-के.एफ.- १४१९)ला जोरदार धडक दिली. यात वाहनचालक महेश सिंगनदुपे जागीच ठार झाला, तर सोनिया पंचवे ही जखमी झाली. फिर्यादी लुकेशदास मुरचुले यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.