लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या अनेक संधी उपलब्ध असून समस्याही आहेत. त्यांचा अभ्यास करून केंद्र व राज्य शासनाकडून मोठा निधी खेचून आणण्याकरिता प्रयत्नशील राहुन दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता कटीबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील मेंढे यांनी दिली.तुमसर येथील गभणे सभागृहात आयोजित सत्कार तथा विजयोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, नितीन सेलोकर, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती अशोक पटले, भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे, तालुकाध्यक्ष राजेश पटले, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, न.प. उपाध्यक्ष कांचन कोडवानी, जि.प. सदस्य संदीप ताले, विजय जायस्वाल अीदी उपस्थित होते.याप्रसंगी आमदार वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, म्हाडा सभापती तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटलेंसह भाजप नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा भाजप, सेना, नगरसेवक, नगरसेविका, भाजप युवा मोर्चा, महिला आघाडी तथा इतर सामाजिक संघटनेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच अविनाश उपरीकर, सरपंच उमेश बघेले, अमीत मेश्राम, नितीश वाडीभस्मे, विक्रम लांजेवार, नगरसेवक कैलाश पडोळे, मेहताबसिंह ठाकुर, मुन्ना पुंडे, बंडू बनकर, सुनील लांजेवार, मतीन शेख, शोभाताई लांजेवार, पल्लवी कटरे, सचिन बोपचे, ललीतकुमार शुक्ला, प्रा.प्रशांत शेंडे, पंकज बालपांडे, किरणताई जोशी, सुनील पारधीसह तालुक्यातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:33 PM
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या अनेक संधी उपलब्ध असून समस्याही आहेत. त्यांचा अभ्यास करून केंद्र व राज्य शासनाकडून मोठा निधी खेचून आणण्याकरिता प्रयत्नशील राहुन दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता कटीबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील मेंढे यांनी दिली.
ठळक मुद्देसुनील मेंढे : तुमसर येथे नवनिर्वाचित खासदाराचा सत्कार