करडी (पालोरा) : गट ग्रामपंचायत खडकी अंतर्गत असलेल्या बोंडे व डोंगरदेव गावात १०० टक्के कोविड लसीकरण पार पडले. मोहाडी तालुक्यातील या दोन्ही गावांनी तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे 'लसवंत' गाव होण्याचा बहुमान मिळविला आहे. मोहाडी तालुक्यातील किसनपूर गावाने तालुक्यातील पहिले 'लसवंत' गाव होण्याचा मान याअगोदरच मिळविला आहे. किसनपूर गावाच्या पाऊलावर पाऊल ठेवीत बोंडे व डोंगरदेव गावाने १०० टक्के लसीकरणाचा कित्ता गिरविला आहे.
विशेष म्हणजे गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. तलमले, पालोरा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणकर, आरोग्य सेविका गीता मरस्कोल्हे व विभागाच्या चमूने मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर खडकी गट ग्रामपंचायतीचे सरपंच अश्विन बागडे, ग्रामसेवक सानप, तलाठी गजभिये, खडकीचे पोलिस पाटील राजू बोंद्रे, डोंगरदेव येथील पोलीस पाटील बोरकर, शिक्षक आदींची विशेष साथ लाभली असल्याचे प्रतिपादन आरोग्य सेविका गीता मरस्कोल्हे यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच अश्विन बागडे म्हणाले, बोंडे व डोंगरदेव येथील ग्रामस्थांनी आरोग्याची काळजी घेत शासनाच्या मोहिमेत सहभाग घेतल्यानेच संपूर्ण गावाचे लसीकरण झाले. आता खडकी ग्रामस्थांनी सुद्धा लसीकरण करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले.
140921\5712img-20210914-wa0098.jpg
बोंडे व डोंगरदेव ठरले तालुक्यातील दुसरे लसवंत' गाव
उपस्थित आरोग्य अधिकारी, सरपंच व ग्रामस्थ