भंडारा : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, मंगळवारी २७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ६८ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर भंडारा आणि लाखनी तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६ हजार ८१० व्यक्तींच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ हजार ५७८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ५१९९, मोहाडी ९७७, तुमसर १५१९, पवनी १२४०, लाखनी १३६१, साकोली १६४२ आणि लाखांदूर तालुक्यातील ६४० व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी ११ हजार ८९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मंगळवारी ४३३ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील ३९, मोहाडी ९ , तुमसर ६, पवनी २, लाखनी ८, साकोली ४ असे ६८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष आणि लाखनी तालुक्यातील ७८ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाने मृतांची संख्या २९६ झाली आहे. तर ३८४ व्यक्ती उपचार घेत आहेत.
बाॅक्स
ॲन्टिजेनमध्ये ९४२१ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात आरटीपीसीआर, ॲन्टिजेन आणि टीआरयूएनएटी चाचण्या करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक रुग्ण ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये आढळून आले. ८६ हजार ७२८ व्यक्तींची तपासणी केली असता ९४२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तर १९ हजार ७९६ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ३०३४ आणि टीआरयूएनएटी अंतर्गत २८६ व्यक्तींपैकी १२३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.