ठळक मुद्देगंभीर अवस्थेत नागपूरला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: भरधाव एसटी बसच्या चाकाखाली एका महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली. साकोली तालुक्यातील एकोडी येथे सत्यभामा बारकू मेश्राम (६०) ही महिला रस्त्यावरून जात असताना बसखाली येऊन तिचे दोन्ही पाय गेले. तिला गंभीर अवस्थेत नागपूरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.