गोवारी समाजाचा मतदानावर बहिष्कार ! समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासनाची उदासिनता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:53 IST2024-11-20T16:52:01+5:302024-11-20T16:53:28+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : Bhandara : समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत

Boycott of Gowari community on voting! Indifference of the government in solving the problems of the society
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात विधानसभेसाठी सर्वीकडे मतदान होत असतांना भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघात गोवारी समाजाने मतदानावर बहिष्कार करून प्रशासनावर नाराजी दर्शवली.
गोवारी समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासन - प्रशासनाची उदासिनता असल्याने साकोली मतदारसंघातील बहुंताश गावात मतदानावर बहिष्कार घातला आहे. साकोली मतदारसंघात बहुसंख्य गोवारी समाज बांधव आहेत. समाजाच्या संघटनांनी मतदान करण्यावर बहिष्कार टाकल्यामुळे केसलवाडा वाघ, एकोडीसह बहुसंख्य गोवारी समाज बांधवांनी मतदान करण्यापासून आपल्याला वेगळे ठेवलेले आहे. आतापर्यंत या समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत.
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील हाय-प्रोफाइल जागांपैकी एक आहे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अविनाश ब्राह्मणकर यांच्यात तणावपूर्ण निवडणूक लढत आहे.