आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील ३० वर्षांपासून राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. असे असताना त्यांच्याकडे तांत्रिक कामे देण्यात आली. मात्र वनविभागाने या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दिली नाही. त्यामुळे या कर्मचाºयांनी तांत्रिक बाबींचा विरोध करून त्यांच्याकडे असलेले जीपीएस संच वनविभागाला परत केले आहे. भंडारासह अड्याळ, तुमसर, साकोली येथील कर्मचाºयांनी ही यंत्र परत केली आहे.वनरक्षक व वनपाल हे पद तांत्रिक नसल्याने व शासनस्तरावर तसा कुठेही उल्लेख नसल्याने या पदाची अन्यायकारक वेतनश्रेणी सुधारणा करण्यात शासनाने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वनरक्षक व वनपालांकडून करण्यात येत असलेली तांत्रिक कामे चुकीची होती काय, असा प्रश्न या कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे. तांत्रिक पदाला मान्यता असतानाही व वनविभागाचे सर्व कामे नियमानुसार हाताळले असतानाही वनकर्मचाºयांना वेतनश्रेणीत सुधारणा करून त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी वनरक्षक वनपाल संघटनेनी केली.मात्र या मागणीकडे वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज बुधवारला भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयातील २२ वनकर्मचाºयांनी ज्यात चार वनपाल व १८ बीटरक्षक यांचा समावेश आहे. यांनी त्यांच्याकडील जीपीएस मशीन व शासनाकडून मिळालेले मोबाईल सीम वनपरिक्षेत्राधिकारी यांना परत केले.यासोबतच वनरक्षक व वनपाल हे एकाच दिवशी दहा पेक्षा अधिक काम करतात म्हणून त्यांना आहारभत्ता नाकारल्याचे उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनात या वनकर्मचाºयांनी म्हटले आहे. वनरक्षक व वनपाल यांची कर्तव्य आठ तासापेक्षा जास्त नसल्याने सदर पदांचा आहार भत्ता नाकारण्यात आलेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या मशीनद्वारे घेण्यात आलेली माहिती संगणकाच्या माध्यमातून वनविभागाच्या वरिष्ठांना देण्यात येते. मात्र सदर मशीन हाताळण्यात वनरक्षक व वनपाल हे तरबेज असतानाही त्यांना तांत्रिक पद मान्यता नसल्याची बाब पुढे करून वेतन सुधारणा करण्यास अडथडा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे या वनकर्मचाºयांनी ही मशीन वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या सुपूर्द केली. मंगळवारला अड्याळ, साकोली व तुमसर येथील वनकर्मचाºयांनी जीपीएस मशीन वनपरिक्षेत्राधिकारी यांना परत दिल्याची माहिती आहे.जीपीएस मशीनअभावी कामे रखडणारवनामध्ये काम करणाऱ्यां वनरक्षक व वनपाल यांच्याकडून वनात सुरू असलेल्या कामांची तंतोतंत माहिती अद्यावत मिळावी यासाठी जीपीएस मशीन पुरवठा करण्यात आली. या मशीनच्या माध्यमातून रोपवन, कुपसिमांकन, खसरा प्रकरणातील मोजणी व अक्षांस रेखांक्ष, प्राण्यांच्या जिवितहानीची नोंदणी व माहिती, वनातील नकाशे, उपचार नकाशा काढणे, ईलेक्ट्रीक लाईनपोल पॉर्इंटची नोंदणी अद्यावत ठेवणे सोबतच या जीपीएस मशीनचा बीट गस्तीत वापर करण्यात येतो, अशा महत्वपुर्ण कामांसाठी मशीन उपयुक्त आहे.तांत्रिक पद नसल्याची बाब पुढे करून वेतनश्रेणी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे वनविभागाच्या तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकून जीपीएस मशीन वनपरिक्षेत्राधिकारी यांना परत केली आहे. जिल्ह्यातील सुमारे २०० बीटरक्षक व ५० वनपाल त्यांच्याजवळील जीपीएस मशीन परत करतील.-टी.एच. घुले, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना भंडारा.
वनकर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:05 AM
मागील ३० वर्षांपासून राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
ठळक मुद्देजीपीएस मशीन केली परत : भंडारा, साकोली, अड्याळ, तुमसर येथील वन कर्मचाऱ्यांचा समावेश