मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे. जिल्ह्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात परप्रांतात स्थालांतरित होत आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक ११ एप्रिल रोजी होत आहे. निवडणूक आयोगाने १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता घोषित केली. सध्या उन्हाळा सुरु असून रोजगार हमी योजनेच्या कामे सुरु होण्याचा हा काळ गणला जातो. रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी ग्रामपंचायतस्तरावरुन करण्यात येते. त्याला मंजूरी प्राप्त झाली. अशी मंजुरी प्राप्त कामे निवडणूक आचार संहितेच्या काळात सुरु होण्यास अडचण नाही. परंतु नवीन रोजगार हमींची कामे सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी आवश्यक असल्याचे निर्देश प्रत्येक तालुका खंडविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवीन कामांना मंजूरी दिल्यावर याबाबत जिल्हाधिकाºयांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांना कळविणे आवश्यक आहे.तुमसर तालुक्यात आचारसंहितेपूर्वी अनेक कामांना मंजूरी मिळाली आहे. अनेक कामे मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. तांत्रिक अडचणीमुळे आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा येथे रोजगार हमी मजूरांना करावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीचा बिगूल मार्चमध्येच वाजणार हे प्रशासनाला माहिती होते. निवडणूक विभागाने महसूल प्रशासनाला तसे निर्देशही दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोजगार हमी कामांना मंजूरीकरिता निश्चितच घाई करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता नवीन कामे सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. तुमसर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतीचे कामे उन्हाळ्यामुळे मजुरांना मिळेनाशी झाली आहे. अनेक मजूर गाव सोडून परप्रांतात कामाला जाण्याच्या तयारीत आहेत. तर अनेकजण लगतच्या छत्तीगड राज्यात कामाच्या शोधात गेली आहेत. सर्वसामान्य रोजगार हमीच्या मजूरांना फटका बसता कामा नये, याकरिता नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा हाताला काम न मिळाल्यास मजूर रोजगाराकरिता गावातून पलायन करीतील. त्याचा परिणाम निवडणुकीवर निश्चित पडेल. मतदानाची टक्केवारी कमी होईल. रोजगार हमींची कामे नियमित सुरु राहावी. त्यास तांत्रिक अडचण येता कामे अशी मागणी होत आहे.आदर्श निवडणूक आचार संहिता नियमानुसार जूनी मंजूर कामे सुरु राहतील. नवीन कामांना जिल्हाधिकाºयांची मंजूरी आवश्यक आहे.-ए.पी. मोहोड, खंडविकास अधिकारी, तुमसरतुमसर पंचायत समिती कार्यालयाकडून सन २०१४ च्या पत्राचा आधार घेऊन नविन कामांना मंजूरी घ्यावी लागेल. जूनीच कामे केवळ सुरु राहतील असे सांगितले जात आहे. जुन्या पत्राचा कसा आधार घेतला जात आहे. याची चौकशी करण्यात यावी’’-हिरालाल नागपूर, रेंगेपार
रोजगार हमीच्या नवीन कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:53 AM
निवडणूक आचार संहिता कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नवीन कामांना ब्रेक लागला आहे. जुनी मंजूर कामे वगळून नवीन कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका रोजगार हमींच्या मजुरांना बसणार आहे.
ठळक मुद्देआचारसंहितेचा फटका : मजुरांचे स्थलांतरण