आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे. राज्य मार्ग मोकळा करण्यासाठी सरपंच पुढाकार घेत असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधण्याची गरज आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गाची लांबी ३० कि.मी. आहे. हा राज्य मार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडणारा आहे. या मार्गावर डिसेंबर महिन्यात जीवघेणे अपघात घडल्याने राज्यमार्ग चर्चेत आला. या अपघातांना नागरिकांनी बांधकाम विभागाला कारणीभूत धरले आहेत. राज्य मार्गावर खड्डे असून हा राज्य मार्ग दोन भागात विभागला आहे. वाढत्या अपघाताला अतिक्रमण, झुडपे तथा दिशादर्शक फलकाचा अभाव. आहे. राज्य मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य आहे. गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी राज्यमार्गाच्या कडेला थेट तणस व खतकुड्याचे ढिग तयार केले आहेत. हे ढिगारे थेट राज्य मार्गावर आले आहेत. या ढिगामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. समोरील वाहने या ढिगाऱ्यामुळे दिसत नाही. राज्य मार्गावरील अपघात टाळण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. या वळणावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळणावर वाहनधारक भ्रमित होतात. बांधकाम विभाग निधीचा वाणवा असल्याचे सांगत आहे. राज्य मार्गावर जीवघेणे अपघात चिंतेचा विषय झाल्याने सरपंचांनी पुढाकार घेतला आहे. बांधकाम विभागाने झुडपी, खड्डे, फलक तथा गावातील सरपंचांसोबत समन्वय साधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.गावातील रस्त्यावर शेतीचे अतिक्रमणगाव शिवारांना जोडणारे रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. सिहोरा परिसरात असणारे रस्ते खड्डेमय आहे. हे रस्ते वाढत्या झुडुपांनी दिसेनाशी झाली असून या मार्गावर जनावरे बांधण्यात येत आहेत. शेतशिवारातून जाणारा रस्ता शेतीच्या हद्दीत गिळंकृत झाला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. महालगाव ते गोंडीटोला मार्गाने प्रवास करताना वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बिनाखी ते सुकळी मार्गावर झुडप वाढल्यामुळे अपघात वाढत आहेत.राज्यमार्गालगत घरांचे वास्तव्य असून बहुतांश शेतकरी आहेत. जागेच्या अभावाने तणीस व खातकुडे तयार केले आहेत. समन्वयातून राज्य मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.-नितीन गणवीर, सरपंच, हरदोली.
अतिक्रमणात गुदमरतोय राज्य मार्गाचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:07 PM
तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देखतकुड्यामुळे अपघात वाढले : व्यथा तुमसर-बपेरा राज्यमार्गाची