जयवंत चव्हाण : युनिटी फॉर आॅलच्या कार्यक्रमात रिक्क्षा वाटपलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : समाजात जाती व्यवस्था बनल्या आहेत. आजही जाती-धर्माच्या नावावर वाद-विवाद होतात. या समेट घडवून आणि जाती धर्माची बंधणे सर्वांनी तोडण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी भंडारा शहरातील युनिटी फॉर आॅलने महत्वाचा पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपाद पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी व्यक्त केले. युनिटी फॉर आॅलच्या वतीने भंडारा ठाणेदार जयवंत चव्हाण यांच्या बदली निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला होता. मेंढा येथील मस्जिद प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नगरसेविका भुमेश्वरी बोरकर, धनराज धुर्वे, ओमप्रकाश थानथराटे, मुरलीधर काबरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी चव्हाण यांनी युनिटी फॉर आॅलचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांनी जाती व्यवस्थेच्या भिंती तोडून एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन केले. संजय जोगदंड यांनी मनुष्याने नेहमी फळाची अपेक्षा न ठेवता काम करत रहावे, असे प्रतिपादन केले. यावेळी जयवंत चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादम्यान दोन सायकल रिक्क्षांचे वितरण करण्यात आले. यावेळी सलीम खान, शरफराज खान, सईद शेख, आसिफ शेख, अयुब शेख, अल्ताफ शेख, प्रशांत गभने, गोपाल ठाकूर, अमित उजवणे, शैलेंद्र श्रीवास्तव, नितीन कुथे, रवी फुलसुंगे, शेख अजीज, शेख शरफरजा, लखन धनवानी, अनवर खान, मुदस्सीर खान, बुशरान खान, अकिल खान, फारूख शेख, सोनु शेख, कलाम बेग, फुकरान हुसैने आदींनी सहकार्य केले.
जाती धर्माची बंधने तोडून नि:स्वार्थ सेवा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:23 AM