मोहाडी पोलिसांनी दिला दम : मृत मुलीच्या आईचा आरोपमोहाडी : अश्लील कृत्य उघडकीस येईल या भीतीने आत्यांने माझ्या मुलीचा खून केला असा आईचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण दडवून ठेवण्यात आले. आत्याच्या घरच्या शेजाऱ्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला. या खून प्रकरणात दोषीवर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार देण्यासाठी मोहाडी पोलीस ठाण्यात गेलेल्या मृतक मुलीच्या आईलाच आधी शवविच्छेदन अहवाल आणा व नंतरच तक्रार घेतली जाईल, असा दम मोहाडी पोलिसांनी दिला. खमारी येथील शीतल मेश्राम यांची मुलगी प्रगती भंडारा येथील आत्याकडे सुटी घालवायला गेली होती. आत्याकडे राहत असताना आत्या अश्लील कृत्य करीत असल्याचे प्रगतीच्या लक्षात आले होते. आपले प्रकरण मुलीच्या लक्षात आले हे आत्याला समजले. आता ती गावी जाईल. नातेवाईकाला सांगेल व बदनामी होईल या भितीने प्रगतीला खमारीला जावू दिले नाही. ९ जून रोजी खमारीचे तुलाराम गयगये प्रगतीच्या आत्याकडे आले. खमारीला येण्यासाठी गयगये यांच्या गाडीवर प्रगती बसली. पण, काका शिशुपाल मेश्राम यांनी गाडीवरुन ओढले. भंडारा येथेच नवीन कपडे घेऊन देऊ. नंतरच गावाला जाशील असे सांगितले. १० जून रोजी प्रगतीला मारहाण केली व गळा दाबून खून केल्याचा आरोप तक्रारीत आहे. याबाबत शहानिशा केल्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या खुनाबाबत तक्रार देण्यासाठी प्रगतीची आई गेली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. मोहाडीचे सभापती हरिशचंद्र बंधाटे यांनी पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्याशी बोलले. १५ जून ला या तक्रार घेवू, असे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)मुलीच्या आईची तक्रार घेण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी संबंधितांना सूचना देण्यात आली आहे.- सुहास चौधरीपोलीस उपनिरीक्षक, मोहाडी
शवविच्छेदन अहवाल आणा, नंतरच तक्रार घेणार ?
By admin | Published: June 18, 2016 12:21 AM