मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ब्रिटिशकालीन मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे केबीन लवकरच इतिहासजमा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर तथा आॅटो सिग्नलिंग (स्वयंचलित) यंत्रणा येथे लावण्यात येणार आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वी येथे रेल्वे केबीन तयार केली होती. सदर यंत्रणा रेल्वे स्थानक व फाटकाशेजारीच एका लहान खोलीतून यापुढे संचालन केली जाणार आहे.भारतीय रेल्वे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सेवेची हमी देते. देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वरील मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्ग तथा तिरोडीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासन आॅटो सिग्नलिंग (स्वयंचलित) यंत्रणा उभी करीत आहे. प्रवाशी व माल वाहतूक गाड्यांची मोठी संख्या, तिसरी रेल्वे ट्रॅक यामुळे मानवी वापराने अपघाताची अधिक शक्यता राहते. अपघात विरहित यंत्रणा विदेशात सध्या राबविली जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्याचा येथे निर्णय घेतला. मोठे रेल्वे जंक्शन तथा रेल्वे ट्रॅकचे जाळे जिथे मोठे आहे त्या रेल्वे स्थानकात सध्या स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला जात आहे. ब्रिटीशकालीन सर्वच रेल्वे मार्गावर एक मोठी महाकाय रेल्वे केबीन सध्या काही मोजक्या रेल्वे स्थानकाशेजारी दिसते. देव्हाडी येथे पूर्व व पश्चिमेला दोन रेल्वे केबीन आहेत. येथे सध्या रेल्वेचे तांत्रिक स्वीचमॅन कार्यरत आहेत. यापुढे रेल्वे स्थानकातून प्रवासी व मालवाहतूक गाडी रेल्वे स्थानकात येणारी व जाणारी रेल्वे संचालन केली जाणार आहे.
ब्रिटिशकालीन रेल्वे केबिन इतिहासजमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:46 PM
ब्रिटिशकालीन मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे केबीन लवकरच इतिहासजमा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर तथा आॅटो सिग्नलिंग (स्वयंचलित) यंत्रणा येथे लावण्यात येणार आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वी येथे रेल्वे केबीन तयार केली होती. सदर यंत्रणा रेल्वे स्थानक व फाटकाशेजारीच एका लहान खोलीतून यापुढे संचालन केली जाणार आहे.
ठळक मुद्दे९५ वर्षांचा इतिहास : रेल्वे प्रशासन उभारणार स्वयंचलित यंत्रणा