लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : मोठा गाजावाजा करुन पवनी येथे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डिजीटल पब्लिक स्कुलची इमारत आता मोडकळीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वीची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेची इमारत पवनीचे वैभव असून हा वारसा जतन करण्याची जबाबदारी जिल्हापरिषदेवर आहे.पवनी येथे शंभर वर्ष जुन्या जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीत डिजीटल स्कूल उभारण्यात आली. यासाठी लोकवर्गणी करुन शाळा नावारुपास आणली. स्वयंस्फुर्तीने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत टाकले. विद्यार्थी ंसंख्या वाढली मात्र इमारत मोडकळीस आली. इमारतीची अवस्था पाहून पालक चांगलेच धास्तावले. मुलांना या शाळेत टाकावे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला. नावारुपास आलेली ही शाळा अवघ्या तीन चार वर्षात पूर्वस्थितीत कशी आली असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र पवनीच्या या शाळेकडे दुर्लक्ष आहे. ब्रिटीशकालीन या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करुन ऐतिहासीक वारसा टिकविण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.लोकसहभागाची गरजजिल्हा परिषदेची डिजीटल शाळा इमारत मोडकळीस आली असून या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकवर्गणीची गरज आहे. या शाळेची अवस्था अशीच राहिल्यास पटसंख्या कमी होण्याची भीती आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
पवनी डिजिटल पब्लिक स्कूलची इमारत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:32 AM
मोठा गाजावाजा करुन पवनी येथे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डिजीटल पब्लिक स्कुलची इमारत आता मोडकळीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वीची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेची इमारत पवनीचे वैभव असून हा वारसा जतन करण्याची जबाबदारी जिल्हापरिषदेवर आहे.
ठळक मुद्देब्रिटिशकालीन शाळा : जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष