शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

बैलही गेला..अन् नांगरही

By admin | Published: November 20, 2015 1:33 AM

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे ....

उरल्या केवळ आठवणी : आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीतमोहाडी : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थतीने बेजार झालेल्या शेतकऱ्याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपारिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.भल्या पहाटे डोक्यावर पारंपारिक नांगर, पुढे बैलांची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी बैलांची जोडी हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यांतील सर्रास शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगरासह पारंपारिक साधने दिसेनाशी होऊ लागली आहेत. बळीराजाने बैलजोड्यांकडे पाठ फिरविल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे शेतात नांगर ओढणाऱ्या बैलांच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. शेती कामासाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी विद्युत मोटारींसारख्या उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. सध्या शेतकरी सर्वच बाजुंनी संकटात सापडला आहे. दुष्काळाची दाहकता वाढली असून सिंचनाची समस्या उभी ठाकली आहे.शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषिप्रधान देशात शेतीच्या कामाकडे युवावर्गाने नाक मुरडल्याने जमीनदार व शेतीमालकही शेती करण्याबाबत निरुत्साही बनले आहेत. पारंपारिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्रसामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा बळीराजाच्या खिशाला अधिक चाट देणारी आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. त्याबदल्यात मिळणारे उत्पन्न आणि हमीभाव याची शाश्वती देता येत नाही. शेतीचे झपाट्याने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्त होत असतो. (शहर प्रतिनिधी)