२३ लोक २१ के
तुमसर: तुमसर देव्हाडी रस्ता नव्याने बांधकाम करून चौपदरीकरण करण्यात आले रस्ता दुभाजक कात सौर ऊर्जेचे दिवे लावण्यात आले काही दिवस ते सुरू होते पुन्हा सौर ऊर्जेच्या खांब काढण्यात आले. सदर खांब वीणा कॉंक्रिटीकरनाने उभे करण्यात आले होते. त्यामुळे वादळात ती पडण्याची भीती होती यावर आक्षेप घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने सौरऊर्जेचे दिवे काढले.
तुमसर- देव्हाडी रस्ता सौर ऊर्जा दिव्याने प्रकाशमान झाला होता. काही दिवस दिवे सुरू होते परंतु सौर ऊर्जा दिवे लावलेले खांब केवळ मातीत घालण्यात आले होते सभोवताली काँक्रिटीकरण केले नाही. त्यामुळे काही ठिकाणी ते वाकलेले दिसत होते वादळामध्ये हे खांब पडण्याची भीती होती यावर आमदार राजू कारेमोरे यांनी आक्षेप घेतला होता सौर दिव्याच्या खांबांना काँक्रिटीकरण करून मजबूत करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले त्यानंतर कंत्राटदाराने अर्ध्या रस्त्यावर लागलेले सौरदिवे चे संपूर्ण खांब काढले पुन्हा काँक्रिट करून सौर दिवे चे दिव्याचे खांब उभे करण्यात येणार आहेत.
तुमसर देव्हाडी रस्ता हा पाच कि.मी.चा असून संपूर्ण रस्त्यावर सौरऊर्जेचे खांब लावण्यात आल्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता प्रकाशमान होणार आहे. पहिल्यांदाच हा रस्ता चौपदरीकरणाच्या करण्यात आला. दुभाजका त फुलझाडे लावण्यात आली आहेत.