लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली.देवेंद्र नत्थु काळसर्पे (४२) रा. कामठी नागपूर असे मृताचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब मार्गावर पंक्चर झाल्याने ट्रक (क्र. एम एच ३१ सीक्यू ९५६४) रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. त्यावेळी तुमसर आगाराची बस क्रमांक एम एच ०७ सी ९५२४ ही तुमसरवरुन हिवराकडे जात होती. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता चालकाचे नियंत्रण गेल्याने बस ट्रकवर जावून आदळली. त्यात ट्रकचा चालक देवेंद्र जागीच ठार झाला. देवेंद्र ट्रकच्या खाली शिरुन दुरुस्तीचे काम करीत होता. त्याचवेळी धडक दिल्याने तो ठार झाला. विशेष म्हणजे ट्रक नादुरुस्त असल्याने त्याच्या बाजूला दगड लावण्यात आले होते. परंतु एसटी चालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी बसच्या चालकाला अटक केली.
उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:10 IST
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली.
उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून एक ठार
ठळक मुद्देकांद्रीची घटना : बस चालकाला अटक