शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

बस-मिनी ट्रक अपघातात चालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:07 PM

खापा चौकात वळणावर विरुद्ध दिशेने येणाºया एसटी व दुधाची वाहतूक करणाºया मिनी ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देखापा चौकातील घटना : मिनी ट्रक झाडावर आदळली, प्रवासी सुदैवाने बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खापा चौकात वळणावर विरुद्ध दिशेने येणाºया एसटी व दुधाची वाहतूक करणाºया मिनी ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने बसमधील सर्वच प्रवासी बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.बस व मिनी ट्रक यांच्यात झालेल्या टक्करनंतर मिनी ट्रक हा झाडावर आदळला. तुमसरहून रामटेक कडे जाणाºया बस क्रमांक एम.एच. ४० - ८६२१ व रामटेकहून तुमसरकडे दुधाची वाहतूक करणारा मिनी ट्रक क्रमांक एम.एच. ३१ सी.क्यु. ८८१५ खापा चौकातील वळणावर मिनी ट्रक बसवर आदळला. बस वळणाहून रामटेक मार्गे जात होती. बसचालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. यात बसचा समोरील भाग मिनी ट्रकला घासून गेल्याने ट्रक अनियंत्रीत होऊन वळणावरील वडाच्या झाडावर आदळला. यात ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. मिनी ट्रकचा चालक या अपघातात गंभीररित्या जखमी झाला. त्याचे नाव कळू शकले नाही. बस प्रवाशांनी भरलेली होती. अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक घटनास्थळी उपस्थित झाले. बसमधील प्रवाशांना दुसºया बसने रवाना करण्यात आले.मिनी ट्रक हा तुमसर कृषी उत्पन्नबाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांच्या मालकीचा असल्याची चर्चा खापा चौकात सुरु होती. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी भेट घेत संबंधितांना निर्देश दिले. खापा चौकात जुने वडाचे झाड आहे. वडाचे झाड वळणमार्गावर असून झाडाच्या पारंब्या लोंबकळत आहेत. यामुळे रामटेक मार्गावर वाहन वळण घेत असताना विरुद्ध दिशेकडील काहीच दिसत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खापा चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची उपस्थिती राहत असली तरी वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने येथे अनेकदा अपघात घडले आहेत.विशेष म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण राज्य मार्ग असलेल्या या खापा चौकात सिग्नलची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे. भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याला जोडणारा चौक म्हणूनही याकडे बघितले जाते. मात्र अपघाताला अनेकदा निमंत्रण मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही, हीच खरी शोकांतिका आहे.