लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेडिमेड कापड दुकानात शिरून चाकूचा धाक दाखवून खंडणी स्वरूपात लुटमार करीत असताना तिथे उपस्थित व्यापाºयांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यातील एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला तर एका आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तुमसरात घडलाविकास उर्फ दुबली दलीराम गिल्लोरकर (३४) रा. कुंभारे नगर तुमसर असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चारदिवसापूर्वीच मध्यवर्ती कारागृहातुन भादंवीच्या कलम ३०२ व ३९२ अंतर्गत शिक्षा भोगून आला होता हे विशेष.तुमसरात व्यापाºयांकडुन ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. कित्येक वर्षांपासून दुकानदारांकडून खंडणी वसुली केली जात आहे. कित्येकदा या गुंडांविरोधात पोलिसात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. आरोपी शिक्षा भोगून आल्यावर तक्रारदाराला शस्त्रांनी मारहाण करीत असल्याने कोणत्याही व्यापारी त्यांच्या विरोधात तक्रार देत नव्हते. त्याचाच फायदा घेत तुमसरात खंडणी वसुली जोमात सुरु झाली. दरम्यान चार दिवसापूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या दुबली गिल्लोरकरने १६ फेब्रुवारी रोजी येथील बापुजी गारमेंट्स दुकाना मध्ये एका साथीदाराला पाठवून दोन शर्ट त्यास देण्यास दूरध्वनी वरून सांगितले होते. मात्र दुकानदार जॅकी हरगुणानी याने कपडे देण्यास नकार दिला. त्यावर आरोपीने मी तिथे येऊन तुला दाखवितो, असे धमकावले. परंतु तो त्या दिवशी न येता दुसºया दिवशी सकाळी ११.३० वाजता दरम्यान दुकानदाराने दुकान उघडताच दुबलीने दुकानात प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवून कपडे नेत असताना दुकानदाराने त्यास विरोध करून आरडाओरड केली. तिथे उपस्थित व्यापारी व नागरिकांनी पकडून त्याला मारहाण केली. त्यातच त्याचा एक साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाला.तुमसरात व्यापाºयांनी एकजुटता दाखविल्याने मुख्य आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची ही पहिली घटना आहे आरोपीला तडीपार करण्यात यावे यासाठी नागरिक व व्यापाºयांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी संघाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल बावनकर, सचिव दिनेश नागापोता, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, युवा नेते पंकज कारेमोरे, नगरसेवक श्याम धुर्वे, कैलास पडोळे, विक्रम लांजेवार, मुन्ना फुंडे व असंख्य व्यापारी व नागरिक उपस्थित होते बातमी लिहेपर्यंत आरोपी वर गुन्हा दाखल होण्यास होता पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.
भरदिवसा सराईत गुंडाला व्यापाऱ्यांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 9:39 PM
रेडिमेड कापड दुकानात शिरून चाकूचा धाक दाखवून खंडणी स्वरूपात लुटमार करीत असताना तिथे उपस्थित व्यापाºयांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यातील एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला तर एका आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तुमसरात घडला
ठळक मुद्देतुमसर येथील घटना : चाकूच्या धाकावर लूटमारीचा प्रयत्न, एक पसार