गोंदिया : या शैक्षणिक सत्रातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३० आॅक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे वाढीव शुल्कासह जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव १ आॅगस्ट पर्यंत महाविद्यालयांमार्फत स्वीकारण्यात येत आहेत. हे प्रस्ताव ३० आॅक्टोबर २०१५ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट देऊन स्वत: कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करण्याच्या सूचना देऊ नयेत. तर महाविद्यालयांनी समिती क्षेत्रातील अर्ज वाढीव शुल्क १०० रूपयांसह स्वीकारून ३० आॅक्टोबर पर्यंत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ नागपूर विभाग येथील कार्यालयात सादर करावयाचे आहेत. असे नागपूर विभागाच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ चे उपायुक्त तथा सदस्यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)
जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव मागविले
By admin | Published: September 14, 2015 12:24 AM