लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी २३, २४ व २५ ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात याव, या सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व आयुष्यमान भारत या योजनेची नोंदणी प्राधन्याने करण्यात यावी, या साठी गावचे सरपंच, तलाठी, कृषी सहायक, ग्रामरोजगार सेवक, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात यावे. या योजनेच्या नोंदणीमधून कुठलाही पात्र लाभार्थी सुटता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा, मोहाडी व साकोली या ठिकाणी संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांचा उपविभागीय स्तरावर बैठक घेवून आढावा घेतला. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हान, तहसिलदार अक्षय पोयाम, गजानन कोकड्डे व अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून मानधन योजनेसाठी अधिकाअधिक नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कामात अडथळा आणणºयावर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांनी दिले. यासोबतच आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करण्यात यावी असे सांगितले. महसुल विभागाच्या कर्मचाºयांनी अभिलेख संगणकीय करण्याचे काम आठ दिवसात पुर्ण करावे असे ते म्हणाले.पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्यांचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २३ ऑगस्ट ते २५ आॅगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याबाबत सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केले.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना केल्या.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा, मोहाडी व साकोली येथे उपविभागस्तरीय बैठक