लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर/चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्याच्या सिंचनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या चांदपूर प्रकल्पाचा उजवा कालवा गुरूवारी रात्री फुटला. त्यामुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. अभियंत्यांनी तात्काळ पाण्याचा प्रवाह बंद केल्याने परिसरातील धान पीक थोडक्यात बचावले. याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश आमदार राजू कारेमोरे यांनी दिले.तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांदपूर गावाजवळ प्रकल्प आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्प तुडूंब भरला आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजवा आणि डावा कालव्यांतर्गत १० हजार हेक्टर शेतीला पाणी वितरित करण्यात येत आहे. मात्र गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चांदपूर शिवारात मुख्य उजवा कालव्याला भगदाड पडले. कालव्याचे पाणी शेतात शिरले. हा प्रकार चांदपूर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यांनी थेट चांदपूर जलाशय गाठले. कनिष्ठ अभियंता जी.आर. हटवार यांनी पाणी विसर्ग बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे शेतीचे नुकसान टळले.मुख्य कालवा हा खूप जुना आहे. त्याची पाळ पोखरली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. कालव्याची लायनिंग विटांची असून त्याही खचल्या आहेत. खेकड्यांनी मुख्य कालव्यापर्यंतच्या पाळीत ठिकठिकाणी भगदाड पाडले आहेत. प्रकल्पातून वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने कालव्याला भगदाड पडले असण्याची शक्यता आहे.चौकशी करण्याचे निर्देशधान पिकाला चांदपूर जलाशयातून पाणी सोडले जात आहे. कालवा फुटल्याची माहिती होताच आमदार राजू कारेमोरे यांनी कालव्याची पाहणी केली. कालवा तात्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश देत चौकशी करण्याचीही सूचना दिली. कालव्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर, राजेश पटले, दिनदयाल टेंभरे, धनलाल शरणागत, संजय ठाकूर, हेमराज लंजे, पिंटू बिसने व शेतकरी उपस्थित होते. सदर प्रकल्पाचा मुख्य कालवा गेल्या अनेक दिवसांपासून निरूपयोगी ठरत आहे. अनेकदा या कालव्यातून पाणी बाहेर पडून शेतात शिरते. कालवा फुटणे हा आता नवीन प्रकार नाही.पाणी वितरणात उजवा कालवा फुटल्याची माहिती मिळताच वितरण थांबविण्यात आले. दुरूस्ती कार्याला गती देण्यात आली. शनिवारपासून पाणी पूर्ववत सुरू करण्यात येईल.-जी.आर. हटवार, कनिष्ठ अभियंता.
चांदपूर प्रकल्पाचा कालवा फूटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 5:00 AM
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांदपूर गावाजवळ प्रकल्प आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्प तुडूंब भरला आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजवा आणि डावा कालव्यांतर्गत १० हजार हेक्टर शेतीला पाणी वितरित करण्यात येत आहे. मात्र गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चांदपूर शिवारात मुख्य उजवा कालव्याला भगदाड पडले. कालव्याचे पाणी शेतात शिरले.
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : निधीअभावी कालवे झाले निरूपयोगी