लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जनगणनेच्या नमुण्यात धर्म, प्रवर्ग व जात विचारण्यात आली आहे. त्यामुळे बौध्द समाजात या नमुन्यातील माहिती सांगतांना संभ्रम निर्माण होतो. जनगणननेतील जातीचा रकाना भरण्याचा आग्रह केला जातो. त्यामुळे जनगणननेमधील जातीचा रकाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा)च्या पदाधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफान शेख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, भारतात सर्वधर्माचे स्वतंत्र विवाह कायदे आहेत. परंतू अद्यापही बौध्द विवाह कायदा झालेला नाही. बौध्द धर्मात स्वतंत्र बौध्द विवाह विधी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र बौध्द विवाह विधी सांगितलेली आहे. परंतु आजही काही नागरिक ‘समान नागरि’ कायद्याखाली संभ्रम निर्माण करीत आहेत.स्वतंत्र बौध्द विवाह कायदा मंजूर करण्यात यावा,अशी मागणी देखील निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष एम. डब्ल्यू. दहिवले, कोषाध्यक्ष एम. यु. मेश्राम, अमृत बन्सोड, डी.एफ. कोचे, अजय तांबे, आनंद मेश्राम, दिगांबर मेश्राम, प्रशांत सुर्यवंशी, उपेंद्र कांबळे, सुरेश सतदेवे यांचा समावेश होता.
जनगणनेतील जातीचा रकाना रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:31 AM
जनगणनेच्या नमुण्यात धर्म, प्रवर्ग व जात विचारण्यात आली आहे. त्यामुळे बौध्द समाजात या नमुन्यातील माहिती सांगतांना संभ्रम निर्माण होतो. जनगणननेतील जातीचा रकाना भरण्याचा आग्रह केला जातो. त्यामुळे जनगणननेमधील जातीचा रकाना रद्द करण्यात यावा, ....
ठळक मुद्देनिवेदन : भारतीय बौद्ध महासभाची मागणी