लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: मुंबई येथील नायर रूग्णालयातील प्रसृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर वैदकीय शिक्षण घेणा-या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांनी २२ मे रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत डॉ.हेमा आहूजा, डॉ.अंकिता खंडेलवाल व डॉ.भक्ती मेहरे यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहूजन आघाडी जिल्हातर्फे धरणे देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना निवेदन देण्यात आले.धरणे आंदोलना मध्ये भारिप व वंचित बहूजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे महासचिव दिपक गजभिये, उपाध्यक्ष नरेंद्र बन्सोड, शहराध्यक्ष शैलेश राहूल, सम्यक विद्यार्थी आंदोलनातील राज्याचे उपाध्यक्ष सोनिया डोंगरे, कार्तिक तिरपुडे, सुरेश बोरकर, शाम भालेराव, भीमराव बन्सोड, रेखा टेंभूर्णे, चंद्रशेखर टेंभूर्णे, रंजित कोल्हटकर, महावीर घोडेस्वार, राजकुमार चिमणकर, हिंम्मत तायडे, अॅड नंदागवळी, ब्रिजलाल मेश्राम, के.एल.नान्हे, कुंदाताई उके, सुरेश खंगार,अरविंद गजभीये, विलास भोवते, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तडवी यांच्या मृत्युप्रकरणी ‘त्या’ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:03 AM
मुंबई येथील नायर रूग्णालयातील प्रसृतीशास्त्र विभागात पदव्युत्तर वैदकीय शिक्षण घेणा-या आदिवासी समाजाच्या डॉ. पायल तडवी यांनी २२ मे रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत डॉ.हेमा आहूजा, डॉ.अंकिता खंडेलवाल व डॉ.भक्ती मेहरे यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहूजन आघाडी जिल्हातर्फे धरणे देण्यात आले.
ठळक मुद्देधरणे : भारिप व वंचित बहूजन आघाडीचे निवेदन