भंडारा विभाग व आगाराच्यावतीने राज्य परिवहन प्रशासनास अंतरिम पगारवाढ तसेच वेतनवाढीचा दर व घरभाडे भत्त्याचा दर वाढविण्याच्या बाबत निवेदन देण्यात आलेले आहे कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांच्या आदेशान्वये कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेच्या वतीने भंडारा विभागात याआधी आंदोलन यशस्विरित्या पार पाडल्या गेलेत. त्याकरिता भंडारा विभागाच्या वतीने विजय नंदागवळी वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रादेशिक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यशाळेचे पंकज वानखेडे, महेंद्र मोरे, सुनील रामटेके, भंडारा आगार विभागीय सचिव दीपक मेश्राम, सोहन मेश्राम, आनंद मोटघरे, प्रशांत भोयर, संतोष ठवकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडकर, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच गोंदिया, तुमसर, पवनी, साकोली, तिरोडा या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM