शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 9:30 PM

वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे आवाहन : होळीमध्ये जळतात हजारो टन लाकडे, होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांचे दहन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होळीच्या दिवशी लाकडे गोळा करून त्याचे दहन केले जाते. दरवर्षी होळीमध्ये हजारो टन लाकडांची आहुती दिली जाते. सण उत्सव साजरे करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र अशा सण उत्सवातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वृक्ष जतन करण्याचा संदेश जाईल. अलीकडे होळीच्या दिवशी वृक्ष पूजनाची एक चांगली परंपरा पर्यावरण प्रेमींनी सुरु केली आहे. होळी न पेटविता एखाद्या वृक्षाचे पूजन करून त्याठिकाणी होळी साजरी केली जाते. होळी साजरी करायची असल्यास शक्यतो लहान करावी. कमीत कमी लाकडांचा उपयोग करावा, अनावश्यक वस्तूंची व पालापाचोळ्यांची होळी करावी. ज्यातून वृक्ष वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल. यासाठी गरज आहे ती पर्यावरण प्रेमींना पुढे येण्याची. पर्यावरणप्रेमींनी जनजागृती केली तर होळी ही पर्यावरण पूरक होण्यास वेळ लागणार नाही.जिल्ह्यात पेटणार २७९४ ठिकाणी होळीरंगांचा सण असलेला होळी हा सण २० मार्च रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७९४ ठिकाणी होळी पेटविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यात १८६७ ठिकाणी सार्वजनिक तर ९२७ ठिकाणी वैयक्तिक होळी पेटविली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास एका वेळी १०० किलो लाकडे धरली तरी हजारो क्विंटल लाकडे एका दिवसात भस्मसात होणार आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिकांनी कमीत कमी लाकडांचा वापर करणे गरजेचे आहे.बंदोबस्तासाठी दीड हजार पोलीसजिल्ह्यात होळी सणानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळीत गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही पोलीस दल तयार राहणार आहेत. पोलीस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५० उपनिरीक्षक, १०६१ पोलीस कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात राहणार आहे. तसेच ४०० गृहरक्षक दलाचे जवानही तैनात राहणार आहेत.रासायनिक रंग टाळाधुळवळ साजरी करताना रासायनिक रंग वापरणे टाळा. हे रंग आरोग्यसाठी घातक असतात. नैसर्गिक रंगाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करून आनंद लुटता येतो.गवराळात पेटते केरकचऱ्याची होळीविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे गत २६ वर्षांपासून लाकडाऐवजी केरकचरा दहन करण्याची परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. या गावात किसनबाबा अवसरे महाराजांचे वास्तव्य होते. हनुमान मंदिरात त्यांचा निवास होता. श्रमदानातून त्यांनी मंदिराचे बांधकाम केले. परिसरात ते प्रसिद्ध होते. श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या किसनबाबाचे १९ मार्च १९९२ रोजी होळीच्या दिवशी देहावसान झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्याचवेळी गावकºयांनी होळी साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सर्वत्र रंगांची उधळण होत असताना गवराळात मात्र किसनबाबा अवसरे यांच्या स्मृतीत त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला जातो. यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जातो.