उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार : विधवांना धनादेश व शिधापत्रिकेचे वाटपतुमसर : १ आॅगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधुन उपविभागांतर्गत तुमसर तसेच मोहाडी तालुक्यातील महसूल विभागाच्या वतीने संयुक्तरित्या तहसील कार्यालय तुमसर येथे महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागांतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार महिला सबलीकरणांतर्गत विधवा महिलांना धनादेश तसेच शिधापत्रिकेचे करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सेवानिवृत्त तहसीलदार अल्का सिंगाडे, गीता कोंडेवार, डि.टी. सोनवाने, धनंजय देशमुख, गौंड, शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याकरिता कोणता न कोणता मुहूर्त हा लागतच असतो. त्याप्रमाणे राजस्व विभागाच्या नविन लेखा हा १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने राजस्व विभागाचा कार्यारंभ महसुल दिन साजरा करुन करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने नुकतेच महसुल दिन रोजी महिला सबळीकरण कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसील कार्यालय तुमसर येथे शामियाना लावून मोठ्या थाटात महसूल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार हरिचंद मडावी यांनी केले. संचालन नरेश कुंभलकर यांनी केले. तर आभार सुनिल लोहारे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)महिला सबलीकरणाकरिता मेळावेपालांदूर : पुरुषाप्रमाणेच महिलांनीसुध्दा स्वत:च्या अधिकाराला समजण्याकरिता १ आॅगस्ट रोजी महसूल दिनाच्या औचित्याने १ ते ७ आॅगस्टदरम्यान महसूल आठवडा राबवण्यिात येत आहे. महिलांकरिता तालुका व गाव पातळीवर मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन लाखनीचे तहसीलदार राजीव सक्करवार यांनी केले आहे. या मेळाव्यात महिलांच्या अडीअडचणी व त्यांच्या सक्षमीकरणाकरिता विशेष मोहिम राबविली जाईल. या मोहिमेअंतर्गत मुद्रा बँक योजना, कृषी विभागाच्या योजना, सहकार महिला व बालविकास आदींच्या योजनांचा महिलांना लाभ देण्यासोबत विविध योजनांची महिलांमध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले आहे.लक्ष्मी मुलगी योजनेअंतर्गत ७/१२ उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलांच्या मालकी हक्कांची नोंद वारसान नोंदणीत महिलांच्या नावाचा समावेश महिला खातेदारांची अभिलेख विषयाची प्रकरणे निकाली काढणे, रोहयोअंतर्गत महिलांकरिता जॉबकार्ड मेळावे व मागदर्शन शिधीपत्रिकेवर कुटूंबप्रमुख म्हणून महिलाची नोंद, १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांची मतदार नोंदणी, शाळा, महाविद्यालयातील मुलींना विविध दाखल्यांचे वितरण व मुलींच्या आत्मसंरक्षणाकरिता पोलीस विभागाच्यावतीने कराटे प्रशिक्षण आदी उपक्रम आठवड्यात राबविण्यात येत आहेत. (वार्ताहर)
तुमसर उपविभागाच्यावतीने महसूल दिन साजरा
By admin | Published: August 03, 2016 12:41 AM