कोंढा-कोसरा : कोंढा येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैल सजवून आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शविली. सजविलेले बालगोपाल आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
तुकडोजी पुतळा, गांधी वाॅर्ड कोंढा येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच गंगाधर जिभकाटे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सेवा सहकारी संस्था सोमनाळा अध्यक्ष वामन पाटील जिभकाटे, ग्रामपंचायत सदस्य अमित जिभकाटे, चरणदास बावने, जिल्हा भाजप सचिव धनराज जिभकाटे, विनोद रोकडे, मारोती जिभकाटे, नेकराम जिभकाटे उपस्थित होते. गावातील मुलांनी आपले नंदीबैल सजवून आणले. यावेळी काव्यांश जिभकाटे प्रथम, दक्ष जिभकाटे द्वितीय, अंशुल एकनाथ पाखमोडे तृतीय, ओवी गाडेकर चतुुर्थ, तसेच मुकुंद माकडे, उत्कर्ष कुर्झेकर, अर्श गोंधळे, मृदुल कुर्झेकर, कान्हा जिभकाटे आणि मनचर जुमळे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भगीरथ माकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा सामाजिक व क्रीडा मंडळ, बालगणेश मंडळ कोंढा यांनी प्रयत्न केले.
080921\img_20210907_174129.jpg
फोटो