२००९-१० पासून जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. मोबाईल टॉवर, वाढते सिमेंटचे जंगल, शेतात रासायनिक खतांचा वापर व इतर अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. चिमणी व इतर अनेक पक्षी हे पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहेत. पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले तर मानवाचे जीवनसुद्धा धोक्यात आले असे म्हणता येईल. त्यासाठी पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
चिमणी या पक्ष्यालासुद्धा अगदी प्राचीन काळापासून साहित्यात मानाचे स्थान दिले आहे. चिमणी हा पक्षी मानवाच्या सहवासात राहतो. लहान बाळांना जेवू घालताना, झोपविताना चिऊताईचे गाणे गायिले जाते.
सकाळी सकाळी अंगणाची शोभा चिऊताई वाढविते. अशा चिऊताईचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय केली पाहिजे. यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती कार्य करताना दिसतात. २०२१ मध्ये जागतिक चिमणी दिवसाची संकल्पना राबविण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर. एल. सांगोळे, गीता भेंडारकर, अंतिमा सांगोळे, डडमल, उमा कारंजेकर, लक्ष्मी ठाकूर, सत्यम ठाकूर, ध्रुवी सांगोळे, विवेक ठाकूर, अश्विनी भेंडारकर यांनी सहकार्य केले.