लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विद्यार्थ्यांसाठी विविध नवोपक्रम राबवित सर्वांगिण शिक्षण देण्याचा प्रयत्नरत असणाऱ्या लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च डिजीटल प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मकरसंक्रांतींचा सणही अविस्मरणीय ठरला. मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्या कल्पकतेतून हा सण चुलबंद नदीच्या नदीपात्रात विविध उपक्रमाच्या आधारे साजरा करण्यात आला.तिळगूळ घ्या गोड गोड बोला, वैरभाव विसरा, बंधूभाव व प्रेमभाव त्याचप्रमाणे समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो, असा संदेश देत विद्यार्थ्यांना पर्यावरणबाबतही माहिती देण्यात आली. बासरीवादनाने कार्यक्रमाची सुरुवात करीत पदवीधर शिक्षक विनोद सहदेवकर यांनी मानवी आरोग्यासाठी तिळगूळचे महत्व काय हे सांगितले.मुख्याध्यापक कहालकर यांनी भारतीय परंपरेतील मकरसंक्रांतीचा सण व त्याचे महत्व विविध दृष्टांत देऊन सांगितले. बासरीवादक पालिकचंद बिसने यांनी सुरेख बासरीवादन केले. प्रास्ताविक चंद्रशेखर कापगते यांनी तर आभार पालिकचंद बिसने यांनी मानले. कार्यक्रमासाठी यशवंत गायधने, नाना कठाणे, केशव वडेकर, चेतना नाकाडे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष चक्रधर तीरमारे, मुख्याध्यापक डमदेव कहालकर यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले.
नदीपात्रात साजरा केला मकरसंक्रांतीचा सण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:39 PM
भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च डिजीटल प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मकरसंक्रांतींचा सणही अविस्मरणीय ठरला.
ठळक मुद्देशिक्षकांचा पुढाकार बासरी वादनाने उपक्रमाची सुरूवात