जवाहर नगर : संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम ठाणा परिसरातील शहापूर, खरबी (नाका), चिखली, परसोडी, नांदोरा या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हा भंडारा व ठाणा येथील स्थानिक समाज संघटना श्री. संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन परिसरात अनेक समाजबांधव एकत्र आले होते. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आध्यात्मिक भजन कार्यक्रम करून खेळीमेळीच्या वातावरणात कोरोना पादुर्भाव व प्रतिबंधक नियम पाळून गर्दी न करता कार्यक्रम पार पडला.
ठाणा (पेट्रोलपंप) येथे महिला आघाडीने विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम साजरा केला. या वेळी सार्वजनिक हनुमान मंदिर विवेकानंद कॉलनीच्या सभागृहात जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठ महिला दुर्गाबाई बालपांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. भजन कार्यक्रम पार पडला व संताजी महाराजांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवा आघाडीचे व स्थानिक संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे, उपाध्यक्ष इंद्रजीत कुर्झेकर, पुरुषोत्तम कांबळे, सल्लागार समितीचे सदस्य सुभाष वाडीभस्मे, अरविंद भिवगडे, किशोर दंडारे, नितीन दंडारे, कवडुजी दंडारे, नत्थुजी कुर्झेकर, शुभम काटकर, सुभाष मलेवार, चोपकर महाराज , उपस्थित होते . कार्यक्रमात माँ भगवती महिला भजन मंडळाच्या सिंग, भारती ठवकर, कविता नीलेवार, रंजना तोडकर यांचा विशेष सहभाग लाभला. कार्यक्रमासाठी किरण राजगिरे, सोनू मेहर, दर्शना गिरडे, कल्पना कुर्झेकर, कल्पना निमकर, किरण बालपांडे, पल्लवी बारई, ममता वाडीभस्मे, लता गायधने वैद्य, मलेवार, काटेखाये, दंडारे यांच्यासह अनेक महिलांचा सहभाग होता. मधुर काटेखाये, गोलू बडवाईक, मृदुल कांबळकर, टिकेश कावळे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पार पाडली.