लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : महाराष्ट्र २००८ पासुन महाआॅन लाईनतर्फे ग्रामीण जनतेला गावातच महसुली सेवा देता यावे म्हणून राज्य सरकारने सेतु व आधार केंद्र सुरु केले. मात्र आता या केंद्र चालकांवर शासन व महाआॅनलाईन कंपनी कुरघडी निर्णय घेवून या महाराष्ट्रतील सेतु चालकांचे शोषण करीत आहे. या उद्देशाने भंडारा जिल्हा महा. ई-सेवा, व्ही. एल. ई. युनियनचे अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना सेतु चालकांवर होत असल्याचे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.यात महाआॅनलाईनच्या आधार केंद्र चालकावर प्रती आॅपरेटर ५० हजार रु. सिक्युरिटी डिपॉझिट, २०१३ पासुनचे आधार चालकांचा कमिशन रोखणे, हिशोब न देणे, तसेच सेतु चालकांची माहे जुन महिण्यापासून कमीशन रोखणे, २०१६ ला भंडारा जिल्हा जिपीएफ मॅपीग करुन त्याचा मोबदला केंद्र चालकांना न देणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे प्रती फार्म १० रुपये प्रमाणे थकीत ठेवणे. जिल्ह्यात दोन वर्षापासून महाआॅनलाईनचा जिल्हा समन्वय पद भरणे, ब्लॅकलिस्ट केलेल्या आधार आॅपरेटरला पूर्ववत सुरु करणे, प्रधानमंत्री पिक विम्याचे कमिशन देणे व सेतु चालकांच्या कमिशनमध्ये वाढ करणे, महिण्याच्या दुसरा, चौथ शनिवार व शासकीय सुटीच्या दिवशी आधार केंद्र सुरु ठेवणे आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना भंडारा जिल्हा व्ही.एलई युनियनच्या वतीने देण्यात आले. या निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्टÑ राज्य, सीईओ मुंबई, युआयडी आरो आॅफीस मुंबई, महसुल मंत्री, सामाजिक न्यायमंत्री व खासदार, आमदार यांना नागपूर येथील अधिवेशनात देण्यात आले. यावर तोडगा न निघत असल्याने ३० जुलै रोजी मुंबई मंत्रालयावर महाईसेवा व्हीएलई युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन आहे. यात महाराष्टÑातील २००० केंद्रचालक येणार आहेत.या मागण्यांचा तात्काळ विचार होऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा न्यायीक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय मतेसह धनपाल चवरे, हिरामण मेंढे, समिर नवाज, दिनेश खरकाटे, टिकाराम टेंभुर्णे, सचिन सार्वे, मनोहर कमाणे, निकीलेश खोब्रागडे, सुरेश गि-हेपुंजे, विनोद भोयर, भाष्कर मारबदे, राजेश खोब्रागडे, राजेश वाधवा, मुकेश कटकवारे, प्रविण पत्तेवार, अजय चौरे, सलीम शेख, महेंद्र वहिले, मोहन भारवे, नाझीर खान, विजय निंबार्ते व जिल्ह्यातील सेतू आधार चालक उपस्थित होते.
केंद्र चालकांच्या समस्या ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:11 PM
महाराष्ट्र २००८ पासुन महाआॅन लाईनतर्फे ग्रामीण जनतेला गावातच महसुली सेवा देता यावे म्हणून राज्य सरकारने सेतु व आधार केंद्र सुरु केले. मात्र आता या केंद्र चालकांवर शासन व महाआॅनलाईन कंपनी कुरघडी निर्णय घेवून या महाराष्ट्रतील सेतु चालकांचे शोषण करीत आहे. या उद्देशाने भंडारा जिल्हा महा. ई-सेवा, व्ही. एल. ई. युनियनचे अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना सेतु चालकांवर होत असल्याचे विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देमानधन देण्याची मागणी : ३० ला मुंबईत मंत्रालयावर हल्लाबोल