आमरण उपोषणाचा इशारा : १४ मागण्यांचा समावेशजवाहरनगर : आॅल इंडिया डिफेंस एम्प्लाईज फेडरेशन अंतर्गत आयुध निर्माणी भंडारा येथील एम्प्लाईज युनियनतर्फे १४ मागण्यासाठी आयुध निर्माणी प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषणाला कामगार बसलेले आहे. प्रशासनाद्वारे मागण्या मान्य न झाल्यास २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आयुध निर्माणी बोर्डाच्या निर्देशानुसार निर्माणी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी उत्पादन होत असलेल्या भवनामध्ये आऊटटर्न लावण्यात यावे, निर्माणीमध्ये हेलमेट शक्तीचे करू नये, येथे ये-जा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विम्याची आवश्यकता समाप्त करा, वाहन पासची एक वर्षाची वैधता बंद करून, स्थाई स्वरूपाची पास देण्यात यावी, पिसवर्करला रात्रकालीन बोनस सण व सुटीच्या दिवशी समाविष्ट करावे, युनिट रन मिलिट्री कॅन्टींग भवनाचे वितार करून सेल्फ सर्व्हिस सुरू करण्यात यावे. भारत सरकारच्या आदेशानुसार समेंक मुल्यांकन बिंदूच्या आधारे वार्षिक ज्येष्ठता सुचिनुसार मृतक, वैधकीय निवृत्ती, बेपत्ता केंद्रीय कर्मचारीच्या परिवाराच्या एका सदस्याला अनुकंपा आधारावर सामावून घेण्यात यावे, बंद केलेले साहुली प्रवेशद्वार सुरू करावे आदी मागण्यांसाठी १३ सप्टेंबरपासून गेट नारेबाजी, धरना आंदोलन आणि १८ सप्टेंबरपासून साखळी उपोषणाला कामगार बसले आहेत. यात एस.पी. खोब्रागडे, वि.ए. कोचे, सुरेश मौर्या, पारस भिंमटे, एस.आय. चौधरी, हसन शेख यांचा समावेश आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. (वार्ताहर)
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
By admin | Published: October 20, 2016 12:35 AM