कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरुन राज्यातील जनतेला या परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी रविवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वितीने जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या आंदोलनप्रसंगी पंचभाई म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची दुर्दशा केली. बेरोजगारी वाढली, शेतकरी विरोधी काळे कायदे लागू केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की केली . रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विकायला काढले जी जनतेची संपत्ती आहे. अशाप्रकारे या सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने सामान्य जनतेची पिळवणूक केली. यांचा निषेध म्हणून रविवारी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, डॉ.विनोद भोयर, मनोज बागडे, धनराज साठवणे, जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर, अवैस पटेल, मार्कंड भेंडारकर, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, राजेश हटवार, राजू निर्वाण, गजानन झंझाड, अजय गडकरी, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, दिलीप निखाडे, गणेश लिमजे, महेंद्र वाहणे, विनीत देशपांडे, लखन चौरे, शालिक भुरे, जीवन भजनकर, संजय वरगणटीवार, संजय बांते, भाऊ कातोरे, अनिल बावनकुळे, निखील तिजारे, देवा इलमे, स्वाती बोंबले , सारिका नागदेवे , कुमुद हटवार, स्नेहा भोवते, संध्या धांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.