शहरातून काढली रॅली : कलापथकातून जनजागृतीभंडारा : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवतींकरिता एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी कलापथक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी शपथ दिली. रॅलीचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. त्यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुनिता बढे, जिल्हा क्षयरोग अधिकारी मनोज येरणे, शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, जिल्हा विस्तार अधिकारी भगवान मस्के उपस्थित होते. सकाळी १० वाजता जे. एम. पटेल महाविद्यालयात महाविद्यालयीन युवक-युवतीकरिता एच.आय.व्ही, एड्स विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राध्यापक शाह यांनी केले. कार्यक्रमाकरिता ओमप्रकाश आकरे, विवेक पशिने, कोमल पशिने, ज्योती श्रावणकर, राहूल गिरी, आशा शेंडे, निलीमा दोंदलकर, प्रेरणा थुल, रोशनी चौरसिया, श्वेता कमाने, सुनिता सुखदेवे, सविता चंद्रिकापुरे व सामान्य रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढून जनजागृती करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
सीईओंनी दिली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खबरदारीची शपथ
By admin | Published: December 02, 2015 12:36 AM