आॅनलाईन लोकमतभंडारा : विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या बाल वैज्ञानिकांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते. यात प्राथमिक गटात महर्षी विद्या मंदिराची चैतन्या वंजारी ही प्रथम तर माध्यमिक गटात पहेला येथील गांधी विद्यालयाचा वैभव घुबडे हा प्रथम आला.शिक्षक गटात माध्यमिक विभागाचे जिल्हा परिषद हायस्कूल धारगांवचे मोहमद्द कलीष मो. हाजी हे प्रथम आले. तर प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडसीचे आर. आर. फंदे हे प्रथम आले. प्रयोगशाळा परिचर विभागात गांधी विद्यालय पहेलाचे डी. पी. मेश्राम हे प्रथम आले. लोकसंख्या प्राथमिक विभागात दहेगांव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे रामप्रसाद मस्के यांच्या सादर केलेल्या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. माध्यमिक विद्यार्थी गटात द्वितीय क्रमांक महिला समाजच्या सई बावनकर हिचा आला तर तृतीय क्रमांक सेंट पिटर्स स्कूल बेलाचा श्रेयस मौर्य याच्या प्रतिकृतीला मिळाला. प्राथमिक विभागात द्वितीय क्रमांक सुरेवाडा जिल्हा परिषद शाळेची मिनाक्षी मसराम हिच्या प्रतिकृतीला मिळाला तर तृतीय क्रमांक अंकुर विद्या मंदिरच्या मोदित खोब्रागडे याच्या प्रतिकृतीला मिळाला.बेला येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी भरविण्यात आली होती. भंडारा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजन केले होते.बक्षिस वितरण कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, प्राचार्य गोडबोले, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. बी. राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी कविता पाटील, मुख्याध्यापक एम. टी. ढेंगे, केंद्र प्रमुख वसंत साठवणे, प्राचार्य ख्रिस्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. विज्ञान प्रदर्शनीत ११ केंद्रातील ११० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचे विज्ञान साहित्य आणले होते.
प्राथमिक गटात चैतन्या, माध्यमिक गटात वैभव प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:33 PM
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या बाल वैज्ञानिकांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी : शिक्षकांमध्ये धारगावचे हाजी प्रथम