उसर्रा येथे मागील चार वर्षापासून धान खरेदी केंद्र सुरु होते. यंदा धान खरेदी केंद्र बंद आहे तो सुरु करण्यात यावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत उसर्रा टाकला रस्ता कामाचे कंत्राट नागपूर येथील सेठ कंपनी ला दोन वरसापासून झालेला आहे. पण कामाला सुरुवात झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५६ मन्सर -रामटेक -तुमसर -गोंदिया मार्गांवरील उसर्रा गावाजवळील सा. क्र.४६ (६२०) करिता पुलाची उंची जास्त झाल्याने सदर रस्त्यावर असलेल्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक 1 जानेवारी पर्यंत सदर मागण्या पूर्ण न झाल्यास २ जानेवारीला तुमसर रामटेक राज्यमार्गांवरील उसर्रा बसस्थानकसमोर चक्कजाम आंदोलन करण्याचा इशारा सरपंच महेश पटले, ग्रामपंचायत टाकला चे सरपंच रामदयाल बिसने, उपसरपंच मनोज शरणागते व उसर्रा, टाकला, टांगा आदी गावातील नागरिकांनी जिल्हा पणन अधिकारी भंडारा, कार्यकारी अभियंता मुखमंत्री सडक योजना भंडारा, कार्यकारी अभियंता नागपूर, पोलीस निरीक्षक आंधळगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
उसर्रा येथे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:33 AM