राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकीकडे शासन पर्यटनस्थळ विकासाबाबत कटीबद्ध असल्याचे सांगत असले तरी गत पाच वर्षापासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तालुक्यातील चांदपूर ला इको टुरिझम बनविण्याचे केवळ दिवास्वप्नच ठरले असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ पासून या पर्यटन विकास मंदावला आणि पर्यटन स्थळ भकास बनू लागले. तेव्हापासूनची ओरड परिसरातील जनता व पर्यटक करीत होते.दरम्यान गत दोन तीन वर्षाअगोदर शासनाने इको टुरिझम अंतर्गत चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली व भंडारा जिल्ह्यातील एकमेव इको टुरिझम म्हणून या स्थळाला मंजुरीही देण्यात आली. त्यानुसार जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) भंडाराकडून २३ मार्च २०१७ ला पर्यटनस्थळाचे सर्वेक्षण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र तो प्रस्ताव अजूनही शासनदप्तरी धूळ खात आहे.पर्यटनस्थळी आणधीच सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची तसेच भाविकांची वाढ होवून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. परिणामी इको टुरिझम अंतर्गत पर्यटनस्थळ विकास होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.डीएफओ भंडारा यांच्या कार्यालयामार्फत २३ मार्च २०१७ ला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रस्ताव पाठविला गेला आहे. मी नव्यानेच रूजू झाल्याने त्यापुढे प्रस्तावाचे काय झाले याची माहिती नाही.-जी.एफ. लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर