पंकजा मुंडे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासनभंडारा : राज्यातील शिक्षकांच्या बदलीसाठी जाहीर केलेल्या नवीन बदली धोरणात शिक्षकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी या बदलीधोरणात आवश्यक ते बदल करण्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला त्यांनी सदर आश्वासन दिले. राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांसह इतर प्रश्नांवर यावेळी मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुंडे यांच्या विधानभवन दालनात या चर्चेसंदर्भात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीचे नेतृत्व प्राथमिक शिक्षक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबोरे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस अप्पासाहेब कुल, उपनेते एन.वाय. पाटील, विकास शेलार, रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, अजमेर मनेर, महेंद्र जानगुडे, राजू खाडे, भंडारा जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, राजेश सूर्यवंशी, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, राजू सिंगनजुडे, एन.डी. शिवणकर, राधेश्याम आमकर, विनायक मोथरकर, सुरेश हर्षे, मकरंद घुगे, रजनी करंजेकर, विकस गायधने, राजन सव्वालाखे, संजय बावनकर, राकेश चिचामे आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मांडलेल्या मुद्यांवर पंकजा मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)या मागण्यांवर झाली चर्चाया बैठकीत प्रामुख्याने प्रशासकीय कारणावरून शिक्षकांच्या तालुक्याबाहेर बदल्या करू नये, आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी दिलेले प्रस्ताव मान्य करावे, १ नोव्हेंबर २०१५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, शाळेसाठी मोफत विद्युत पुरवठा करण्यात यावा, १०० टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप शाळा समितीच्या माध्यमातून करावा, वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेश योजनेचे आदेश निर्गमीत करावे, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे पूर्वीप्रमाणे भरावी, प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापक देण्यात यावे, नगरपालिका व महानगरपालिका शाळेला गटविमा योजना लागू करावी या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
शिक्षक बदलीचे धोरण बदलवू!
By admin | Published: April 11, 2017 12:39 AM