शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

वेळेसोबत बदलणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:47 PM

वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देनिरझर कुलकर्णी : जे. एम. पटेल महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट फोरम’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील पर्ल चेंबरमध्ये व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘मॅनेजमेंट फोरम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिकर, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे, मॅनेजमेंट फोरमचे पदव्युत्तर विभाग अध्यक्ष प्रशांत वाघाये, पदवी विभाग अध्यक्ष रोहित मुंडाफोडे उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, व्यवस्थापनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. चांगली कौशल्य, उत्तम संभाषण, वेळेचे महत्व, दूरदृष्टी या गोष्टी आपण स्वत:मध्ये बिंबवल्या पाहिजेत. आपल्या वाटेत अनेक अडथळे येतात ते खरं म्हणजे आपलं ज्ञान तपासण्यासाठी एक नवी संधी घेऊन आले आहेत, असा विचार करून त्याला सामोरे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या विचारकक्षा रुंदावल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी शिकणयासाठी मॅनेजमेंट फोरम हे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सर्व क्षेत्रात पुढे राहायला पाहिजे. चांगली कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. अशी कौशल्य की या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी मदत करतील. असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमने यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातुन फोरमच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसंबधी माहिती दिली आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित केल्या जातील असे सांगितले.डॉ. पणिकर म्हणाले, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी म्हणून या फोरमचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी केला गेला पाहिजे. चांगली नोकरी अथवा उत्तम व्यवसाय थाटण्यासाठी ज्ञानासोबतच अष्टपैलु व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे. आणि ते अष्टपैलु व्यक्तिमत्व या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घडवावे. कार्यक्रमादरम्यान फोरमचे पदाधिकारी आणि सदस्यांचे स्वागत करण्यात आले.संचालन विशाल हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन शुभांगी गणवीर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ. पायल पशीने, प्रा. मनीष शेंडे, प्रा. सनी सत्यपाल, प्रा. भारती बारापात्रे, प्रा. मानसी यांचे तसेच एमबीए, बीबीए, बीसीसीएच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.