रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.मध्यप्रदेश राज्याचे हाकेच्या अंतरावर बपेरा आंतर राज्यीय सिमा आहे. सिहोरा पोलीस स्टेशन पासून १३ किमी अंतरावर असणाऱ्या या सिमेचे संदर्भात पोलीस प्रशासन गंभीर नाही. याच सिमेवर पोलिसांचे तपासणी नाका मंजुर करण्यात आलेला आहे. देवसर्रा गावाचे हद्दीत जागेची चाचपणी करण्यात आली आहे. महसुल विभागाची जागा राखीव करण्यात आली असतांना इमारत बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशी अवस्था या तपासणी नाक्याची झाली आहे. मध्यांतरी १० लक्ष रुपये या तपासणी नाक्याचे बांधकामाकरिता मंजुर झाले असल्याची माहिती व चर्चा होती. परंतु ही चर्चा नंतर हवेत विरली. दरम्यान या तपासणी नाक्याची जबाबदारी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नियुक्त केले जात नाही. या पोलीस स्टशेनमध्ये ठिकठाक नाही. कामाचे वाढते व्याप असल्याने मोठी कसरत पोलीस करित आहे. पोलीस स्टेशनमध्ये ५३ पदे असून फक्त २५ पोलीस कार्यरत आहे. बिटमध्ये कार्यरत हवालदारांची रिक्त पदे डोक्याला ताप आणणारी आहे. वाहतुक पोलिसांवर राज्य मार्गाची जबाबदारी आहे. २८ कि.मी. पर्यंत राज्य मार्गाचा विस्तार असून वाहतुक पोलिसांचे खांद्यावर बपेरा बिट सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. एका बिटमध्ये अनेक गावांचा समावेश असल्याने पदे रिक्त आहे. काही बिटाचा कारभार शिपाई पदाचे कर्मचाºयांवर देण्याची पाळी आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी पोलीस भर्ती करण्यात येत आहे. पंरतु पोलिसांचे रिक्त पदाचे असणारे अनुशेष भरुन काढण्यात येत नाही. सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये असणाºया रिक्त पदाकडे जिल्हा प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते.पथक कालबाह्यमुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचे विरोधात कारवाईकरिता चिडीमार पथक कार्यरत होते. परंतु सुरक्षा व धाक निर्माण करणारा हा पथक कालबाह्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे गर्दीचे ठिकाणी टवाळखोरीचे प्रकार वाढले आहे.
‘बॅरिकेड’च्या भरवशावर तपासणी नाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:40 AM
बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देआंतरराज्यीय सीमेवरील प्रकार : चौकशीची गरज