भंडारा : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका गीता बाेरकर या हाेत्या. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षक बी. आर. मेश्राम, एस. एच. कापगते, व्ही. डी. कालेजवार, सी. वाय. गिरीपुंजे, प्रेरणा कंगाले, वैभवी गाेमासे, श्रीराम सार्वे यांच्यासह दहावीचे विद्यार्थी उपस्थित हाेते. यावेळी वैभवी गाेमासे, कल्याणी निंबार्ते, निवेदिता बागडे, माेनाली गिरीपुंजे, सुहानी रामटेके, अंजली तितीरमारे यांनी विचार व्यक्त केले. मुख्याध्यापिका गीता बाेरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेचे राजे कशा पध्दतीने काळजी घेत हाेते, याची उदाहरणे दिली. प्रास्ताविक विलास कालेजवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा कंगाले यांनी तर भीमराव मेश्राम यांनी आभार मानले.
पिंपळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:40 AM