लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकमेव शासकीय जलतरण तलाव असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील तलावात एका १५ वर्षीय बालकाचा बुडून करूण अंत झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकिला आली. तोफिर शेख कय्यूम शेख (१५) रा. बैरागी वाडा, भंडारा असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बालकांच्या सुरक्षेबाबत पुन्हाव एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रविवारी जलतरण तलाव बंद असतोे. त्याठिकाणी चौकीदार असतो. तोफिर शेख हा रविवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या दोन मित्रांसह जलतरण तलावाच्या दिशेने गेला. जलतरण केंद्र बंद असल्याने आवारभिंतीवरून उडी मारून तिघेही आतमध्ये शिरले. दरम्यान, जलतरण तलावात खोल पाण्यात गेल्याने तोफिर बुडू लागला. हे बघून त्याच्या दोन्ही मित्रांनी पळ काढला. तथापि, ते पळून जात असताना तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. त्या मुलांनी तोफिर तलावात बुडाल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली होती. परंतु, सुरक्षा रक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. इकडे, दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या तोफिरची शोधाशोध सुरू होती. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती.सोमवारी सकाळी जलतरण केंद्रात पोहण्यासाठी आलेल्या काही जणांना बालकाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच जलतरण केंद्रात एकच गर्दी झाली. चौकशीअंती तो मृतदेह तोफिरचा असल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकाने तोफिरच्या मित्रांच्या सुचनेची वेळीच दखल घेतली असती तर कदाचित तोफिरचे प्राण वाचू शकले असते, असा सूर आज उमटत होता.जलतरण केंद्रात कोणतीही सुरक्षा नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी, जलतरण केंद्र चालक व सुरक्षारक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तोफिरच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. याबाबत नागपूरच्या क्रीडा उपसंचालकांनी भंडारा जिल्हा क्रीडा कार्यालयाला भेट देत याबाबतची तपशिलवार माहितीही जाणून घेतली.
भंडारा येथे जलतरण तलावात बालकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 8:47 PM
जिल्ह्यातील एकमेव शासकीय जलतरण तलाव असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील तलावात एका १५ वर्षीय बालकाचा बुडून करूण अंत झाला.
ठळक मुद्देपुन्हा सुरक्षा ऐरणीवरजिल्हा क्रीडा संकुलातील घटना