लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पाहुणा म्हणून आलेला बालक मित्रांसमवेत नदीपात्रात पोहण्यासाठ गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील परसोडी पाऊलदवना येथील बोथली नदीत उघडकीस आली. शुक्रवारी बुडालेल्या बालकाचा मृतदेह तब्बल २४ तासानंतर शनिवारी आढळून आला.होमदेव सुधाकर तरारे (१६) रा.पुनापूर पारडी नागपूर असे मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवारी तो नागपूर येथून मंगेश भेंडारकर व रितेश वेरूळकर या मित्रांसोबत मंगेशच्या मुळ गावी परसोडी येथे आले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे तिघेही जण गावालगतच्या बोथली नदीत पोहण्यासाठी गेले. तिघेही दुचाकी नदीकाठावर ठेवून पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने होमदेव हा पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतु होमदेवचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरु केला. परंतु रात्री अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरु झाला. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर शनिवारी दुपारी ४ वाजता होमदेवचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांनी भेट दिली. अधिक तपास दिघोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.या घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनी नागपूरवरून थेट परसोडी गाठले. होमराजचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.
नागपूर येथील बालकाचा बोथली नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 AM
होमदेव सुधाकर तरारे (१६) रा.पुनापूर पारडी नागपूर असे मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवारी तो नागपूर येथून मंगेश भेंडारकर व रितेश वेरूळकर या मित्रांसोबत मंगेशच्या मुळ गावी परसोडी येथे आले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे तिघेही जण गावालगतच्या बोथली नदीत पोहण्यासाठी गेले. तिघेही दुचाकी नदीकाठावर ठेवून पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने होमदेव हा पाण्यात बुडाला.
ठळक मुद्देपोहायला जाणे जीवावर बेतले। परसोडी येथील घटना