लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला व बालविकास विभागाचे कार्य जिल्हयात उत्कृष्ट असून यापुढे ग्रामस्तरावर होणाऱ्या बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग आॅनलाईन प्रक्रियेमुळे भंडारा जिल्हयाची माहिती अद्ययावत ठेवता येईल, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास विभागाचे सहसचिव ला.रा. गुजर यांनी केले. महिला व बालविकास, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने आयोजित बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग प्रशिक्षणादरम्यान ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात, जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या प्रशिक्षणाचे उदघाटन सहसचिव ला.रा. गुजर यांचे हस्ते पार पडले.याप्रसंगी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे निवृत उपायुक्त डि.जे. मुंडे, महिला व बालविकास विभागाचे कक्ष अधिकारी रमेश सरफरे, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे, भंडारा व गोंदिया जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम माता सरस्वतीच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून लाईन लिस्टींग व आधार नोंदणी प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.गुजर पुढे म्हणाले, राज्यात महिला व बालविकास विभागाचे वतीने अंगणवाडीतील बालके व त्या अंतर्गत लाभार्थ्यांची माहिती अदयावत व्हावी याकरिता अंगणवाडी पर्यवेक्षिकांना बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग सॉफटवेअरच्या माध्यमातून प्रशिक्षीत केल्या जात आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिका या प्रशिक्षणातून माहितीचे धडे मिळणार आहेत. त्यांना युजर आयईडी व पॉसवर्ड उलब्ध करून देवून बालआधार नोंदणी व माहिती आॅनलाईन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल.जिल्हयात चार हजार बालकांची माहिती आॅनलाईन झालेली असून उर्वरित माहिती व बालआधार नोंदणी प्रशिक्षीत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे माध्यमातून पूर्ण होईल अशा आशावादही त्यांनी व्यक्त केला.मुंबई येथील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नवनाथ घोरपडे, आकाश, अक्षय यांनी बाल आधार कार्डचे महत्व, बालआधारकार्ड नोंदणींची प्रक्रीया, येणा-या समस्या याबाबत माहिती दिली.तसेच बालकांची माहिती व त्या अंतर्गत लार्भार्थ्यांची माहती आॅनलाईन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बाल आधार नोंदणी व आॅनलाईन माहिती करण्याबाबत पर्यवेक्षिकांना प्रात्यक्षिकासह धडे दिल्याने आता ग्रामस्तरावर आधार नोंदणी व माहिती आॅनलाईन करण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रांरभ होणार आहे.या सुविधेमुळे अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांची आधार नोंदणी निु:शुल्क करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्हयातील १२० अंगणवाडी पर्यवेक्षिकांची उपस्थिती होती. अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब व थंब मशिनचे वितरण करण्यात आले आहे, हे विशेष.महिला व बालविकास अधिकाऱ्यांचा गौरवभंडारा जिल्हयात महिला व बालविकास विभागाचे कार्य उत्कृष्ठ असून या नंतरही हे कार्य आदर्श ठरणारे असेल या शब्दात महिला व बालविकास विभागाचे सहसचिव गुजर यांनी, महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मनिषा कुरसंगे यांचे कौतूक केले. त्यांचे हे कार्य उत्तरोत्र मौलाचे ठरावे याकरिता सहसचिव गुजर यांचे हस्ते महिला व बालविकास अधिकारी कुरसंगे यांचा प्रशिक्षणादरम्यान गौरव करण्यात आला. तसेच त्यांना सहाय करणारे विस्तार अधिकारी मंगेश भांडारकर यांचेही कौतूक केले. संचालन बालविकास प्रकल्प अधिकारी फाळके व पर्यवेक्षिका मेंढे यांनी तर आभार बालविकास प्रकल्प अधिकारी निपसे यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विस्तार अधिकारी मंगेश भांडारकर, युवराज पोहळे, मोहूर्ले, पटले, रामटेके यांनी परिश्रम घेतले.
बाल आधार नोंदणी आॅनलाईन प्रक्रियेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:45 PM
महिला व बालविकास विभागाचे कार्य जिल्हयात उत्कृष्ट असून यापुढे ग्रामस्तरावर होणाऱ्या बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग आॅनलाईन प्रक्रियेमुळे भंडारा जिल्हयाची माहिती अद्ययावत ठेवता येईल, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास विभागाचे सहसचिव ला.रा. गुजर यांनी केले. महिला व बालविकास, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने आयोजित बाल आधार नोंदणी व लाईन लिस्टींग प्रशिक्षणादरम्यान ते बोलत होते.
ठळक मुद्देसहसचिव गुजर यांची माहिती : दोन्ही जिल्ह्यातील १२० अंगणवाडी पर्यवेक्षिकांची उपस्थिती